पांढरे डाग(vitiligo) व उपचारपद्धती

आजकालच्या परफेक्शनच्या जगात पांढरे डाग म्हणजे सौंदर्याला लागलेले ग्रहण समजले जाते. सर्वसामान्याच्या भाषेत आपण त्यांना पांढरे चट्टे असही म्हणतो. डॉक्टरांच्या सल्यानुसार त्वचेला रंग देणारे रंगद्रव्य गेल्यामुळे हे पांढरे डाग पडतात.

हे पांढरे डाग शरीराच्या कुठल्याही भागात येऊ शकतात. जसे कि, त्वचा , केस(डोक्यावरचे आयब्रो, पापणीचे, दाढीचे), डोळे, तोंडाच्या आतील भाग, गुप्तांग.

या रोगात त्वचेला रंग देणाऱ्या मेलॅनीन (Melanin) नावाच्या रंग्द्रव्याचे प्रमाण कमी होते व त्वचेचा  नैसर्गिक रंग जातो यामुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास कमी होतो व डिप्रेशन(Derpression) येते. असे आलेले डाग कधी कधी वाढत जातात अथवा शरीराच्या दुसऱ्या भागात पण नवीन डाग येतात.

कारणे :-

जगात जवळपास बऱ्याच लोकांना पांढरे चट्टे येतात. पांढरे चट्टे येण्याची रीस्क(Risk) खालील लोकांमध्ये जास्त आहे.

  • रक्ताच्या नातेवाईकांमध्ये कुणास आधीच चट्टे असल्यास
  • Autoimmune disease(स्वयंप्रतिकार) रोग जसे कि, हशीमोटा रोग / अलोपेशिया एरीएटा( Alopecia Areata)

त्वचेला व केसांना रंग देणाऱ्या मेलॅनीन रंगद्रव्य असणाऱ्या melanocytes मेलॅनोसाईट पेशी नष्ट होऊ लागतात.

या रोगाच्या एका प्रकारात ( Non segmental vitiligo) स्वयंप्रतिकार रोग होतो. त्यात आपले शरीर आपल्याच मेलॅनोसाईट पेशींना (melanocytes) ला Foreign Body म्हणजे बाहेरून आलेले जंतू समजून त्यावर हल्ला करून त्यांना नष्ट करतात.

दुसऱ्या प्रकारात (segmental vitiligo) मध्ये आपल्या शरीराची Nervous System(मज्जासंस्था) अस्ताव्यस्त होते व Melanoctyte पेशींना नष्ट करते.

उपचारपद्धती:-

  1. औषधउपचार –

साधारणत: छोट्या पांढऱ्या डागांसाठी त्वचेवर लावण्यासाठी क्रीमस देतात ज्यामुळे त्वचेला रंग येतो जवळपास ४५% रुग्णांना ४ ते ६ महिन्यात त्वचेला रंग येतो.

काही औषधे त्वचेच्या काही भागात जसे कि, चेहरा येथे अधिक परिणामकारक आहेत पण हात, पाय येथे फारसा फरक पडत नाही

ह्या औषधांचे दुष्परिणाम पण आहेत जसे त्वचा खूप कोरडी पडणे व अतिनाजूक होऊन जाने

  1. लाईट थेरपी:-

तोंडावाटे psoralen हा वनस्पती पासून मिळवलेला पदार्थ देऊन लाईट थेरपी देतात. त्या उपचारपद्धती मध्ये रुग्णास आठवड्यातून ३ वेळा अये ६ महिने ते 1 वर्ष यावे लागते.

  1. शस्त्रक्रिया:-

जर मोठे पांढरे छाती आहेत किवा औषधांनी व लाईट थेरपीने परिणाम होत नसल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे . यात तीन प्रकार आहेत

  1. स्कीन –

यात तज्ञ शल्यचिकित्सक उर्वरित नैसर्गिक त्वचेचा छोटा भाग(मांडीवरून ) काढून पांढऱ्या चट्टयाच्या ठिकाणी लावतात. यामध्ये color match रंग तंतोतंत जुळून येत नाही. तसेच दाती जागा (मंदी) वर देखील व्रण येतो.

  1. माय्क्रोपीगमेंटेशन (Tattoing)

यात तज्ञ डॉक्टर एका स्पेशल मशिनच्या सहायाने रंगद्रव्य त्वचेत टाकतात व पांढऱ्या त्वचेला नैसर्गिक त्वचेचा रंग दिला जातो यापद्धतीत artificial color मेडिकल द्वारे त्वचेत टाकले जातात. या उपचारपद्धतीत Repeated Setting ची गरज लागू शकते.

  1. मेलॅनोसाईट ट्रान्स्फर

या उपचारपद्धतीत त्वचेला व केसांना ज्या पेशीमुळे रंग येतो अश्या मेलॅनोसाईटस ला काढून पांढऱ्या चट्टयावर प्रत्यारोपित केले जाते. या उपचार पद्धतीचा फायदा असा आहे कि, येणारा रंग हा तंतोतंत नैसर्गिक त्वचेसारखा असतो व Repeated Setting ची गरज नसते.

 

तर मग तज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसार कोणती उपचार पद्धती तुमच्यासाठी योग्य आहे हे ठरवता येते. आजकाल वाढत्या यशस्वी परिणामामुळे मेलॅनोसाईट ट्रान्स्फर पद्धतीचा वापर वाढलेला दिसून येतो.

 

 

                                                                                                                      इलाईट कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी व लेजर सेंटर

                                                                                                                      परशुराम अपार्टमेंट (वूडलॅंड शोरुम वरती)

                                                                                                                      कॉलेजरोड,नाशिक फो. ०२५३ – ६६२०८०९/९९२२०५५३५२

Share this post