वाढते शहरी प्रदूषण, व्यस्त जीवनशैली व रसायन फवारणी युक्त जेवण(अन्न) ह्या अशा अनेक कारणामुळे केस गळणे हे सामान्य झाले आहे. डॉ. मनोज बच्छाव नामांकित प्लास्टिक सर्जन यांनी ह्या विषयावरील सर्वसामान्य प्रश्नाची उत्तरे दिली आहेत.
केस का गळतात?
Male Pattern baldness हा सर्वसामान्यपणे पुरुषांमध्ये होतो. हे सामन्यात: पुरुषी हार्मोन्स Testosterone हे DTH ( Dihydro testosterone) मध्ये रुपांतरीत होते. ह्या DTH व वंशपरंपरागत जनुके (Genes) ह्या दोघांच्या एकत्रित परिणामाने केस गळतात.
सामन्यात: अशा प्रकारचे केस प्रामुख्याने टाळूच्या काही भागातच होतो, त्यामुळे अशा प्रकारच्या टक्कल असलेल्या लोकांना केस प्रत्यारोपनासाठी लागणारे केस टक्कल नसलेल्या भागातून यशस्वी पद्धातीने काढून प्रत्यारोपण करता येतात.
केस प्रत्यारोपण म्हणजे काय?
केस प्रत्यारोपण म्हणजे केसांचे कलात्मक पुनर्वितरण यात प्रमुखत: टाळूवरच्या मागील भागातील केस कलात्मकतेणे टक्कल असलेल्या भागात प्रत्यारोपित करतात. जिथे जास्त संख्येत केस आहेत, तिथून आम्ही केस काढून जिथे गरज आहे अशा टक्कल असलेल्या भागात टाकतो.
केस प्रत्यारोपण मध्ये दोन प्रकार आहेत.
1) FUT (Follicular unit transplantation)
2) FUE (Follicular unit extraction)
FUT – यामध्ये केस जिथून काढतात तिथून केसांबरोबर स्कीनची स्ट्रिप (पट्टी) काढली जाते. व ती जागा टक्क्यांनी शिवली जाते. ह्या पध्दतीचा प्रमुख मर्यादा म्हणजे दाता जागेवर व्रण येतो.
FUE – यामध्ये प्रत्येक hair follicle स्वतंत्रपणे काढले जाते. त्यामुळे मागील बाजूस व्रण राहत नाही,काढलेले follicles ज्यांना Graft असे हि म्हणतात. ते(रेसिपीयन्ट) प्राप्तकर्ता भागात प्रत्येकी एक एक असे रोवले जातात. येथे कुठलेही टाके येत नाही व जखम लवकर भरून येते, तसेच डोनर जागा कळून येत नाही.
प्रत्यारोपण(Transplant) केलेले केस किती दिवस राहतात.
प्रत्यारोपण(Transplant) साठी घेतलेले केस हे मुळातच केस गळण्याच्या प्रक्रियेला संवेदनशील नसल्याने कितीही केस गळाले तरी हि मागील बाजूचे केस राहतात, ते कायामस्वरुपी असतात.
हि प्रकिया वेदनादायक आहे का?
केस प्रत्यारोपण(hair Transplant) हि प्रकिया वेदनादायक मुळीच नाही, हि प्रकिया करताना त्या ठिकाणी भूल (Local Anesthesia) देऊन हि प्रकिया केली जाते, त्यामुळे ती वेदनाविरहित तसेच सुरक्षित आहे.
केस प्रत्यारोपण का? व कोणी करावे
आजच्या या धक्काधकीच्या जीवन शैलीत स्वतःची प्रगती साधण्यासाठी व्यक्तिमत्व विकास हा अतिशय महत्वाचा घटक आहे. व्यक्तिमत्व विकासात व्यक्तीचे दिसणे हा एक महत्वाचा भाग आहे.आता केस गाळणे या समस्यावर केस प्रत्यारोपण हा पर्याय आल्याने यावर व्यक्ती सहज मात करू शकतो.
योग्य सर्जन शोधणे
केस प्रत्यारोपण हि प्रकीया योग्य सर्जन कडून करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या क्षेत्रात निपुण असलेल्या सर्जनकडून केस प्रत्यारोपण करून घेणे फार महत्त्वाचे आहे. योग्य सर्जन शोधण्यासाठी आधी त्यांना भेटून आपले शंकानिवारण करणे महत्त्वाचे आहे.
आता नाशिक मध्ये प्रथमच केस प्रत्यारोपण सोबत, लायपोसक्शन, स्तनावरील शस्त्रक्रिया तसेच इतर कॉस्मेटिक सर्जरीस बजाज फायन्यांस (Bajaj Finance) मुळे 0 % व्याजदरावर सुलभ हफ्त्यावर उपलब्ध आहे.
इलाईट कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी व लेजर सेंटर
परशुराम अपार्टमेंट (वूडलॅंड शोरुम वरती)
कॉलेजरोड,नाशिक फो. ०२५३ – ६६२०८०९/९९२२०५५३५२