नाकाच्या सुबकीकरणाची शस्त्रक्रिया – Rhinoplasty

जगात सौंदर्याच्या अनेक निकषां पैकी एक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाक

सुंदर, सरळ,बारीक नाक चेहऱ्याची शोभा अनेक पटींनी वाढवते व त्याबरोबर वाटतो तो आपला आत्मविश्वास त्यामुळे नाकाचे सौंदर्य वाढवणे आता फार सोपे झाले आहे. ह्यासाठी राय्नोप्लास्टी हि शस्त्रक्रियाकेली जातेआज कालच्या इंस्टाग्राम, फेसबुक वर असलेल्या स्वतःला अपटूडेट ठेवणाऱ्या मिल्लेंनियल जनरेशन मध्ये रहिनोपलास्टी सारख्या नाक सुबक करणारी ही शस्त्रक्रिया लोकप्रिय आहे. आता आपल्या नाशिक शहरातही हिची मागणी प्रचंड वाढलेली आहे.

रायनो प्लास्टि म्हणजेच नोज जोब ही प्लास्टिक सर्जरी नाकाला सुबक करण्यासाठी केली जाते.

नाकाचा वरचा भाग हाडाने बनलेला असतो व खालचा कार्टिलेज ने बनलेला असतो रहिनोपलास्टी मध्ये आपण हाड ,कार्टिलेज ,स्किन या सर्वांमध्ये बदल करू शकतो ही शस्त्रक्रिया नाकाच्या खालच्या भागात एक छोटासा कट देऊन केली जाते, त्यामुळे नंतर तिथे कुठलीही खूण दिसून येत नाही.

ही शस्त्रक्रिया खालील कारणांसाठी केली जाते.

१. जन्मतः नाकाचा आकार खराब असणे अथवा व्यंग असणे.

२. अपघातानंतर कधीकधी नाकाचा आकार बदलतो तो पूर्ववत करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

३. कॅन्सर अथवा दुसऱ्या काही आजारामुळे नाकाचे reconstruction करण्यासाठीही शस्त्रक्रिया केली जाते.

४. बऱ्याच वेळा नाकाच्या विशिष्ट आकारामुळे श्वासोच्छवासात त्रास होतो व दिसायलाही नाक वेडेवाकडे असते त्यासाठी ही septorhinoplasty शस्त्रक्रिया केल्यास अशा रुग्णांना व्यवस्थित श्वसन व नाक दिसायलाही सुंदर करता येते.

५. वाकडे, बसकेनाक, नाकाचा शेंडा पसरट असणे तसेच नाकाचा वरचा भाग पसरट असणे, नाकाच्या ( nasal bridge) खडडा अथवा उंचवटा असणे ह्यासाठी हि शस्त्रक्रिया केल्यास नाक सुबक होऊ शकते

६. कॉस्मेटिक रहिनोपलास्टी सध्याच्या या युगात आपली पर्सनालिटी अधिक उठावदार करण्यासाठी व नाक सुंदर करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.

 

रहिनोपलास्टी या शस्त्रक्रियेचे दोन प्रकार असतात

१. ओपन रहिनोपलास्टी

२. क्लोज रहिनोपलास्टी

नाकामध्ये कमी बदल करावयाचे असल्यास closed रहिनोपलास्टी केली जाते, ह्यात नाकाच्या खालच्या भागात एक छोटासा कट देऊन बदल केले जातात.मात्र नाकाच्या हाडात व कार्टिलेजमध्ये अधिक बद्दल करावयाचे असल्यास ओपन रहिनोपलास्टी केली जाते. आपणास कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया लागणार ते आपले प्लास्टिक सर्जन पूर्ण चेक-अप करून सांगू शकतील

ह्या शस्त्रक्रिये मध्ये प्लास्टिक सर्जन नाकाची स्कीन व सोफ्ट टिशू ,हाड व कार्टिलेज ह्यापासून वेगळे करतात. त्यानंतर त्या हाडामध्ये ,कार्टिलेज मध्ये बदल करतात कार्टिलेज ग्राफ्ट किंवा बोन ग्राफ्ट वापरूनही नाकाचा आकार बदलला जातो. ह्यात ऑटोलोगौस ग्राफ्ट म्हणजे आपल्याच बॉडी तून काढलेला ग्राफ्ट हा एक तर Nasal  septum मधून अथवा कोस्टल कार्टिलेज ग्राफ्ट म्हणजेच आपल्या  बरगड्या मधून घेतला जातो .

सिंथेटिक ग्राफ्ट म्हणजेच सिलिकॉन इम्प्लांट वापरले जातात.

ही शस्त्रक्रिया संपूर्ण भूल देऊन केली जाते.

शस्त्रक्रियेनंतर काही दिवस नाकाला nasal splint दिली जाते.

डॉ. मनोज बच्छाव प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन असून त्यांचा सुबक रहिनोपलास्टी मध्ये विशेष हातखंडा आहे, मुंबई येथील प्रदीर्घ अनुभवानंतर उत्तर महाराष्ट्रात अनेक रुग्णांचे नाक सुंदर करण्यात डॉ. बच्छाव यांचा मोलाचा वाट आहे . त्यांचे  इलाईट कॉस्मेटिक सर्जरी कॉलेज रोड नाशिक येथे त्यांचे सेंटर आहे.

Read more...