केस गळतीवर हेअर ट्रान्सप्लांट खरचं प्रभावी आहे का?
हेअर ट्रान्सप्लांट सध्या काळाची गरज ठरत आहे आजच्या युगात केस गळणे अकाली टक्कल पडणे अशा अनेक गोष्टींनी आजची युवा पिढी त्रस्त आहे केस गळण्या मुळे अकाली टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास खच्चीकरण होत आहे,डिप्रेशन अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत
आधीच्या काळात चाळिशीनंतर येणारे टक्कल आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, जीवनात तणाव, भेसळयुक्त जेवण, प्रदूषण, बदलत चाललेली जीवनशैली या सर्वांमुळे विशीतच यायला लागले आहे
टक्कल पडले की वय जास्त दिसते, आत्मविश्वास कमी होतो. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम दिसायला लागतो. हा गेलेला आत्मविश्वास हेअर ट्रान्सप्लांट करून परत मिळवता येतो पण हेअर ट्रान्सप्लांट चे रिझल्ट हे कितपत प्रभावी आहेत हा प्रश्न प्रत्येक रुग्णाच्या मनात येतो आणि अशाच प्रश्नांची आज आपण उत्तर देणार आहोत.
1) केस गळतीवर हेअर ट्रान्सप्लांट हाच उपाय आहे का?
केस गळतीवर बरेच उपचार पद्धती उपलब्ध आहे केस गळतीचे प्रमाण कमी असल्यास औषध उपचार, पीआरपी व मिझोथेरपीने केसांची डेन्सिटी वाढवता येते व केस गळती अधिक असल्यास हेअर ट्रान्सप्लांट करता येते.
2) हेअर ट्रान्सप्लांट चा सक्सेस रेट किती आहे? व तो कोणत्या बाबींवर अवलंबून आहे?
हेअर ट्रान्सप्लांट अतिशय यशस्वी अशी उपचार पद्धती आहे.
पण तिचा सक्सेस रेट हा काही गोष्टींवर अवलंबून आहे जसे की
- सर्जनचे अनुभव व कौशल्य
कारण तुमचा सर्जन ठरवतो किती टक्कल आहे त्याला किती ग्राफ्ट लागतील व ते डोनर एरिया मधून कशा पद्धतीने काढले जावेत काढतांना केसांच्या मुळाला धक्का न लागता काढले जावेत जेणेकरून काढला जाणारा प्रत्येक केस यशस्वीपणे टक्कल असलेल्या जागी उगवला पाहिजे.
- शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारी मशिनरी
हेअर ट्रान्सप्लांट मध्ये वापरली जाणारी मशिनरी ही अतिशय महत्त्वाची असते. केस मुळासकट काढण्या साठी वापरले जाणारे मायक्रोमोटर, त्याचा स्पीड, वापरले जाणारे पंचेस हे किती शार्प आहेत यावरही काढल्या जाणाऱ्या केसांच्या मुळाची गुणवत्ता अवलंबून असते.
- हेअर ट्रान्सप्लांट कुठे होत आहे?
ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.
इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स नुसार हेअर ट्रान्सप्लांट स्पेशल ओटी सेट अप मध्ये केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये सर्व असेप्टीक कंडिशन्स मध्ये शस्त्रक्रिया केली जाते व एमर्जन्सी कंडीशन साठी बॅकअप ही असतो त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट नंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स,इन्फेक्शन टाळता येतात व 100% रिझल्ट येण्यास मदत होते.
3) हेअर ट्रान्सप्लांट का फेल होतात?
हेअर ट्रान्सप्लांट फेल होण्याचे बरीच कारणे आहेत.
आपण कोणाकडून हेअर ट्रान्सप्लांट करून घेत आहात?
आपले डॉक्टर प्लास्टिक सर्जन अथवा ट्रेण्ड डर्मेटोलॉजिस्ट आहेत का ते स्वतः सर्जरी करणार आहेत की कोणी टेक्निशन आपली सर्जरी करत आहे.
कारण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी ही केवळ टेक्निकल नसून आर्टिस्टिक सुद्धा आहे तुमच्या सर्जन लाच ह्या गोष्टी माहीत आहेत की केसाच्या मुळाला धक्का न लागता तो कशा पद्धतीने काढला गेला पाहिजे कमीत कमी वेळात तो टक्कल पडलेल्या ठिकाणी कुठल्या डिरेक्शन मध्ये व किती डेन्सिटी मध्ये प्रत्यारोपित केला गेला पाहिजे जेणेकरून येणारा रिझल्ट नैसर्गिक व उत्तम येईल.
बऱ्याच वेळा हेअर ट्रान्सप्लांट करणारी व्यक्ती अनुभवी अथवा तितकी कुशल नसल्यास व योग्य मशिनरी नसल्यास केस काढताना मुळाला धक्का लागून ते अर्धवट बाहेर काढले जातात त्यामुळे तो टाकला जाणारा ग्राफ्ट फेल जातो यालाच ट्रांजेक्शन रेट असे म्हणतात.
4)हेअर ट्रान्सप्लांट चा नैसर्गिक रिझल्ट येतो का?
हे ट्रान्सप्लांट चा रिझल्ट अतिशय नैसर्गिक येऊ शकतो हा तीन गोष्टींवर अवलंबून आहे
- डेन्सिटी
केस प्रत्यारोपित करताना जर ते योग्य डेन्सिटी मध्ये टाकले गेले तर येणारा परिणाम अतिशय नैसर्गिक दिसतो.
- Direction
काढलेला केसाचा ग्राफ्ट कुठल्या दिशेमध्ये टाकला जात आहे. त्यानुसार त्याची वाढ होते त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ही टाकला जाणारा प्रत्येक ग्राफ्ट हा ऑलरेडी असलेल्या केसांच्या दिशेमध्ये टाकला गेला पाहिजे.
- हेअर लाईन
साधारणतः केस प्रत्यारोपण नंतरचा तुमचा लूक तुमच्या हेअर लाईन वर अवलंबून असतो. आपण कधी साधारण व्यक्तीच्या हेअरलाईन ला बघितल्यास ती कधीच सरळ नसते नेहमी क्रिस क्रॉस असते त्या पद्धतीने केस प्रत्यारोपित केले गेले पाहिजेत.
- सर्जन चे कौशल्य व अनुभव
डिरेक्शन,डेन्सिटी,हेअर लाईन या सर्व गोष्टी तुमचा सर्जनच्या कौशल्यावर ही अवलंबून असतात.
5) हेअर ट्रान्सप्लांट चे काही कंपलिकेशन्स आहेत का?
हेअर ट्रान्सप्लांट ही अतिशय सेफ सर्जरी आहे.
पण
- त्यासाठी आपण कुठे सर्जरी करत आहोत?
- स्वतः सर्जन सर्जरी आपली करत आहे का ?
- ओटी सेट अप मध्ये आहे का?
- सर्व इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स फॉलो करून शस्त्रक्रिया केली जात आहे का?
- हेअर ट्रान्सप्लांट आधी मेडिकल व्हॅल्युएशन व फिजिकल फिटनेस करून घेण्यात आली आहे का?
- शस्त्रक्रियेदरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स झाल्यास इमर्जन्सी बॅकअप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे का?
- आपली शस्त्रक्रिया डॉक्टर सेंट्रींक हॉस्पिटल अथवा क्लिनिकमध्ये होत आहे की गुणवत्ता नियंत्रित नसलेल्या व येणाऱ्या परिणामाला जबाबदार नसलेल्या कमर्शियल चेन क्लिनिक मध्ये होत आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
या सर्व बाबींची उत्तम चौकशी करून हेअर ट्रान्सप्लांट केल्यास 100% यशस्वी होऊ शकते व कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.